Ad will apear here
Next
पडघा मराठी शाळेत शाहू महाराज जयंती साजरी
भिवंडी : तालुक्यातील पडघा केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आज (२६ जून) राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख रमेश शेरे, मुख्याध्यापिका शोभा आहेर, माजी मुख्याध्यापिका साधना पाटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, सहशिक्षिका कुंदा कदम, हर्षला बांगर, संगिता लोखंडे, रेखा बगाडे, माधुरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  

कुंदा कदम यांनी प्रास्ताविकातून शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी युवा कवी जाधव यांनी विद्यार्थ्यांसमोर शाहू महाराजांचे कार्य सांगत ‘आरक्षणाचे जनक’, ‘शाळेमध्ये जिजाऊ’, ‘सावित्री, रमाई शिकवा ना’ या कविता सादर केल्या. केंद्रप्रमुख शेरे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महामानवांच्या कार्याची माहिती नेहमीच देण्याचे आवाहन करत आम्ही पाहुण्यांचे स्वागत फुलांनी न करता पेन, पुस्तक भेट म्हणून देऊन करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा कदम यांनी केले. शेरे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZIJCB
 Nice news channel1
 खूपच छान सर.महिला मंडळी नेहमीच असे कार्यक्रम साजरे करतात.1
Similar Posts
भादाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला भालेकर भिवंडी : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व पाच गावांमध्ये विस्तार असलेल्या भादाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या उर्मिला रमेश भालेकर यांची आठ जानेवारी २०१९ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापतीपदी वैशाली चंदे बिनविरोध पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघा विभागातील बोरीवली जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या वैशाली विष्णू चंदे यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
कांदळी येथे महिलांना गॅस संचाचे वाटप पडघा : भिवंडी तालुक्यातील कांदळी व बोरीवली जिल्हा परिषद गटातील गरीब महिलांना श्री मीनाक्षी फाउंडेशनतर्फे गॅस संचाचे वाटप करण्यात आले.
पडघा येथे लोकशाही उत्सव साजरा भिवंडी : लोकशाहीचे महत्त्व घराघरात पोहोचविण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या सभागृहात लोकशाही उत्सव साजरा करण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language